येस न्युज मराठी नेटवर्क : संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुमठे येथे अखंड हरिनाम सपताह आयोजित करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारीपासून या सप्ताहाला सुरुवात होत असून, माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
२७ फेब्रुवारी रोजी विठ्ठल कंदारे यांचे तर २८ फेब्रुवारी रोजी पुरुषोत्तम पाटील यांचे हरिकीर्तन होणार आहे. १ मार्च रोजी हभप निवृती महाराज देशमुख आणि २ मार्च रोजी डॉ. जयवंत बोधले महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे.
३ मार्च रोजी ज्ञानेश्वर महाराज पठाडे आणि ४ मार्च रोजी समाधान शर्मा महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे. ५ मार्च रोजी बाळकृषण गडकर तर ६ मार्च रोजी हभप सुधाकर महाराज इंगळे यांचे हरिकीर्तन होणार आहे. ६ मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाचा समारोप होणार आहे.