GBS-पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. असे असताना या जीबीएस आजाराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. GBS हा आजार दूषित पाण्यामुळे होतं असल्याचे या आधी सांगण्यात आलं होतं, तसा दावा देखील करण्यात आला होता. मात्र या आजाराचे संक्रमण होण्यामागे आणखी एक कारण समोर आले आहे.
GBS आजार हा केवळ दूषित पाण्यामुळे नाही तर, कोंबड्यांमुळे होतं असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, असेही अजित पवार म्हणाले. तर कोंबड्याचे मास घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे.