सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड शैक्षणिक समूहाचा पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था प्रॅक्टिकल एज्युस्किल्स सोबत ज्युनिअर कॉलेज ऑफ प्रॅक्टीकल कॉमर्स, प्रॅक्टीकल बीकॉम, प्रॅक्टीकल बीबीए, प्रॅक्टीकल एम.बी.ए. हे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भातील कराराची घोषणा सोमवार २१ डिसेंबर रोजी करण्यात आली. आयुष्यातील अमूल्य पंधरा वर्षे शिक्षण घेऊन पारंपारिक पदवी मिळवून त्यांच्या वाट्याला येणाऱ्या बेरोजगारीचे विश्लेषण करून या दोन्ही संस्थांनी शिक्षणामध्ये हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले असल्याचे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मित शहा आणि कुमार करजगी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रॅक्टिकल ११ वी/ १२ वी या उपक्रमाअतर्गत विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेज खासकरून विद्यार्थ्यांना ११ वी व १२ वी मध्येच प्रॅक्टीकल अकाऊंटन्सी व टॅक्सेशनचे प्रक्षिक्षण देवून त्यांना व्यवहार ज्ञान देऊन आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने या दोन्ही संस्था प्रयत्न करणार आहेत.
प्रॅक्टिकल बी.कॉम आणि प्रॅक्टीकल बीबीए हा उपक्रम ३ वर्षाचा आहे ज्यामध्ये पहिले १ वर्ष क्लासरूम ट्रैनिंग आणि २ वर्षे ऑन द जॉब ट्रेनिंग त्याचबरोबर सुमारे दरमहा ६००० ते १०,००० विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे.
प्रॅक्टिकल एम.बी.ए.हा उपक्रम २ वर्षाचा आहे. ज्यामध्ये पहिले ६ महिने क्लासरूम ट्रैनिंग आणि १८ महिने इंटर्नशिप त्याचबरोबर सुमारे दरमहा ८००० ते १५००० विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे.
असे एकंदरीत ११ वी पासून , एमबीए पर्यन्त सर्व उपक्रम येथे नव्याने सुरू होणार असून आर्ट्स, कॉमर्स , सायन्स शाखेच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शिक्षण घेत असतानाच स्वत:ला आत्मनिर्भर होण्याचे आवाहन नागेश करजगी ऑर्किड एज्युकेशन संस्थेचे प्रमुख कुमार करजगी व प्रॅक्टिकल एज्युस्किल्स, पुणेचे सीईओ सन्मित शहा यांनी केले आहे.
प्रवेशासाठी पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेशासंदर्भात जुनी मिल कंपौंड येथील एन.के. ऑर्किड कॉलेज ऑफ प्रॅक्टीकल कॉमर्स येथे ९९६०८०११०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे यावेळी सांगण्यात आले.पत्रकार परिषदेला झेबा खातून,संतोक सिंग सहोता आणि सन्मती क्षिरसागर उपस्थित होते.