केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार , गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे सिलेंडर 550 रुपयांवर गेला आहे. तर बिगर उज्ज्वला योजनेतील सिलेंडर 803 वरून 853 रुपयांवर पोहोचला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली. आधीच वाढणारी महागाई, त्यात सिलेंडरही महाग झालं आहे. त्यामुळे याचा परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे.
एलपीजी गॅस दरवाढ आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढलेल्या किमती 8 एप्रिल मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. गॅस विक्रीत तेल कंपन्यांचे 43,000 कोटी रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.