पुणे: खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावातील शेतकरी शंकर पाटोळे यांच्याकडील लाडक्या बैलाचा मृत्यू झाला होता. बैलाच्या मृत्यूननंतर शंकर पाटोळे यांनी दशक्रियाविधी घातला. इतकेच नव्हे तर बैलाची आठवण कायम राहावी यासाठी घरासमोर बैलाचा पुतळाही उभारला आहे.
बळीराजा शेतकरी आपल्या लाडक्या बैलाचे पोटच्या मुलाबाळांप्रमाणे सांभाळ करतो,एवढेच नाही तर बैलाच्या मृत्यूनंतरही शेतकरी या बैलांचा दशक्रियाविधी घालतो आणि असाच काहीसा प्रकार खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावात घडला असून शंकर पाटोळे या शेतकऱ्याने आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यूनंतर दशक्रियाविधी घालत बैलाची आठवण कायम राहावी यासाठी घरासमोर बैलाचा पुतळाही उभारला आहे.पाटोळे यांच्या घरच्याच गाईला 28 वर्षांपूर्वी गोऱ्हा झाला होता,या गोऱ्हांचे नाव त्यांनी शेलार असे ठेवले. हा गोऱ्हा त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य झाला होता.