• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तब्बल 32 वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

by Yes News Marathi
September 6, 2023
in इतर घडामोडी
0
शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तब्बल 32 वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षकदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून शंकरराव मोरे विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान
पुणे : शिक्षकदिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने भारती विद्यापीठ (संचलित) कोथरूड येथील शंकरराव मोरे विद्यालयात शिक्षण घेतलेल्या तत्कालीन विद्यार्थ्यांचा दहावीचा वर्ग तब्बल 32 वर्षांनी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स येथे भरला. तत्कालीन शिक्षकांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिक्षक विद्यार्थीही आठवणीत रममाण झाले. यावेळी दैवतासमान शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामुळे तत्कालीन शिक्षक भारावून गेले. हीच आमच्या शैक्षणिक क्षेत्रात कामाची पावती असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. यावेळी संपूर्ण अमेरिका व महाराष्ट्रातून माजी विद्यार्थी आले होते.शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने शंकरराव मोरे विद्यालय माजी विद्यार्थी संघ 1991 व इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स यांच्या संकलपेनेतून 1991 मध्ये दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पुन्हा दहावीचा वर्ग भरवला आणि शिक्षकांचा सन्मान सोहळा तत्कालीन शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांचा 32 वर्षांनी दहावीचा वर्ग इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स येथे भरविण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक एकनाथ दांडगे, भाऊसाहेब निकम, मधुकर पाटील, स्मिता सातपुते, बनसाडे सर, विलासराव पवार, अरुंधती महाम्बरे, नितिन म्हेत्रे, सुवर्णा माने, सुचित्रा वाळुंज, स्नेहलता पवार यांचा सनमन करण्यात आला . माजी विद्यार्थी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (आयओपी)चे संचालक प्रोफेसर प्रमोद जाधव यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात सन्मानाने कार्य करत असल्याचे सांगितले. यावेळी प्रमोद कदम, रावसाहेब दगडेपाटील, राहूल जोशी, शाम दरेकर, मंगेश वाळवे, अजय सातकर (अमेरिका), अभिजित हांडे, बालवडकर, प्रदीप क्षिरसागर, धनंजय पाटील, शंकर ठाकूर, मुनेश्‍वर केंदळे, संतोष धुमाळ, संदीप कुंबरे, अनिल कोठावले, प्रमोद शिंदे, सुरेश राऊत, दिनेश बराटे, विराज कुचेकर, गणेश ढमाले, उदय राऊत, अनिल धोत्रे, अंनत भोंगाडे, शैलेद्र सनप, रविंद्र माने, राहुल दगडे, सुनिल मांजरे आदी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

Tags: gratitudeTeacher's Daythe class of 10th met
Previous Post

सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे निधी मागणी प्रस्ताव तात्काळ सादर करावेत -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

2 उद्योजक मित्रांनी दिली 32 हजारांची शिष्यवृत्ती

Next Post
2 उद्योजक मित्रांनी दिली 32 हजारांची शिष्यवृत्ती

2 उद्योजक मित्रांनी दिली 32 हजारांची शिष्यवृत्ती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group