येस न्युज मराठी नेटवर्क : लॉकडाउनच्या काळात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सलग पाचव्या दिवशी अवैध धंद्यांवर बेधडक कारवाई करत दारूच्या बाटल्या मोबाईल आणि हातभट्टी चे रसायन असा दीड लाखांचा माल जप्त केला आहे. पांगरी व वेळापूर पोलीस ठाण्याने केलेल्या कारवाईत ४९,७५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. तर ग्रामीण जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईमध्ये एकूण ४४ गुन्हे दाखल करीत १,००,२९९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई विशेष पोलिस पथकामार्फत स्थानिक गुन्हे शाखा व वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अंतर्गत करण्यात आली.
