सांगली (सुधीर गोखले) – सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या कामकाजाविषयी नागरिकांना असणारे अनुभव काही नवीन नाहीत त्यातच आता कारण मिळाले ते म्हणजे शासनाच्या ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानाचे, आज चक्क महापालिकेच्या लेखा विभागातील कर्मचारीच जागेवर नसल्याची प्रचिती खुद्द स्थायी समिती सभापतींना आली आणि त्यांनी या विभागालाच टाळे ठोकण्याचा प्रकार घडला. सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या प्रभागातील विविध विकासकामांची फाईल्स लेखा विभागामध्ये आहेत आणि सध्या महापालिकेची मुदत संपण्यास काही दिवसच शिल्लक असल्याने सध्या विकासकामांच्या फाईल मंजूर करून घेण्यासाठी धावपळ सुरु आहे.
खुद्द सभापतींच्या फाईल चार वेळा परत आल्याने सभापती धीरज सूर्यवंशी यांनी बुधवारी लेखा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या दालनामध्ये येण्यास सांगितले मात्र बरीच प्रतीक्षा करूनही कोणीही सभापतींच्या दालनात आले नाहीतच पण साधा त्यांचा फोन हि उचलला नाही अखेर सभापती महोदयांनी त्वरित लेखा विभाग गाठला तर तिथे एक सुद्धा कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले अखेर सभापतींनी या विभागाला टाळे ठोकले यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे संतोष पाटील उपस्थित होते.
अखेर या विभागातील अधिकाऱ्यांनी सभापतींची मनधरणी केल्याने सायंकाळी पाच वाजता कुलूप निघाले मात्र सभापतींच्या या ऍक्शन मोड मुळे एकच खळबळ उडाली. विद्यमान सभागृहाची मुदत १९ ऑगस्ट रोजी संपत असल्याने विकासकामांच्या मान्यतेसाठी धावपळ सुरु आहे पण प्रशासनाने अद्याप कोणत्याही प्रकारे यागोष्टीची फारशी दखल घेतलेली नाही त्यात लेखा विभागातून संथ गतीने कामकाज सुरु आहे फाईल्स चा निपटारा होत नाही प्रशासनाने या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात अशी मागणी सभापती सूर्यवंशी यांनी केली आहे.
योग्य कारवाई करू ;
आयुक्त सुनील पवारआज झालेल्या प्रकारची मी गंभीर दखल घेतली आहे लेखा विभागातील कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर असणे आवश्यक आहे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान कार्यालयीन कामकाज सांभाळून करायचे आहे या संदर्भात मी माहिती मागवली आहे शहानिशा करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात होईल