सोलापूर-हैदराबाद महामार्गावर चिवरी फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या क्रुझर जीपला अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, 12 जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये पूजा हरी शिंदे (30, रा. ऊळेगाव), सोनाली माऊली कदम (22, रा. हडपसर) आणि साक्षी बडे (19, रा. हडपसर) यांचा समावेश आहे.
जखमींमध्ये कुणाल लक्ष्मण भिसे, अंजली रवी अमराळे, आकाश दत्ता कदम, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, बालाजी शिंदे, माऊली कदम, हरी शिंदे, कार्तिक आमराळे, कार्तिकी आमराळे, शिवांश कदम आणि श्लोक शिंदे यांचा समावेश आहे.
अपघातानंतर मदतनीस राजू वडवेराव आणि प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी तत्परतेने मदत कार्य हाती घेऊन सर्व जखमींना सोलापूर सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहन व अज्ञात वाहनाच्या शोधासाठी तपास सुरू आहे




