येस न्युज मराठी नेटवर्क : विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविषयी विद्यापीठास वेळो वेळी निवेदन दिले,परंतु विद्यापीठाकडून आतापर्यत कसलेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही म्हणून आज विद्यार्थी परिषदेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरूच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले.
ज्या विद्यार्थ्यांचे मार्च/एप्रिल २०२० मध्ये फॉर्म भरावयाचे राहिले होते. अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म ऑक्टोबर २०२० मध्ये अतिविलंब शुल्कासह नोव्हेंबर २०२० मध्ये परीक्षा घेऊ या आश्वासनावर भरून घेतले परंतु डिसेंबर अर्धा संपला अजूनही या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन विद्यापीठाकडे नाही तरी अभाविप अशी मागणी करते की नुकतेच परीक्षेचे निकाल लागले ज्यात अनेक विद्यार्थ्यांना समस्या आल्या निकाल राखीव असणे, अनुउपस्थिती दर्शवणे व अनेकांनी चांगले पेपर देऊन नापास झाल्याच्या तक्रारी अभाविपकडे आल्या होत्या त्याविषयी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करून देखील त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले नाहीत व विद्यार्थ्यांना छायांकित प्रत मिळावी ही मागणी आपण केली ज्यावर दि.७/१२/२० रोजीच्या परिपत्रकात पुनर्मुल्याकन व छायांकित प्रत सुविधा देता येणार नाही असे विद्यापीठाने नमूद केले आहे. परंतु मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाद्वारे (२००७) विद्यापिठाला छायांकित प्रत उपलब्ध करून देने बंधनकारक आहे व ती उपलब्ध त्यांनी करून द्यावी, तसेच विद्यार्थी समस्या सांगण्यासाठी परीक्षा नियंत्रकांना फोन केले असता एक पण फोन लागत नाहीत व विद्यार्थी गेट वर आला असता त्याला आत सोडल जात नाही अश्या एक न अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी व विद्यार्थी हिताच्या रास्त मागण्या वारंवार विद्यापीठाकडे निवदनाद्वारे केल्या होत्या परंतु विद्यापीठ प्रशासनाने याची योग्य ती दखल न घेतल्यामुळे अभाविप विद्यार्थी हिताच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केला आणि शेवटी विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 21 तारखेला याबाबतीत निर्णय घेऊ व तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे अभाविपने हे आंदोलन मागे घेतले.जर तसा निर्णय झाला नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी याहीपेक्षा तीव्र आंदोलन अभाविप करेल.यावेळी महानगर मंत्री अनिकेत प्रधाने, पंढरपूर तालुका प्रमुख आनंद भुसनर, जिल्हा संयोजक प्रणव बडगंडी, सोलापूर जिल्हा सह-संयोजक रेवती मुदलियार सृष्टी डांगरे उपस्थित होते.