सोलापूर : आधार योगा ग्रुप आणि संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शनिवारी १९ जून रोजी राजेश कोठे नगर येथील मुक्ताई मंदिरात योग, प्राणायाम व ध्यान शिबीर सुरू करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवारी २१ जूनपर्यंत चालणार असून सकाळी ५:३० ते ७ या वेळेत योग, प्राणायाम व ध्यान शिकवण्यात येणार आहे. या शिबिराचे उदघाटन सकाळी हेमंत पिंगळे,सुनील खटके, पुष्पा मुलगर यांच्या हस्ते करण्यात आले. पतंजली योग समितीचे प्रशिक्षक भगवान बनसोडे व संजय अर्धापूर यांनी मार्गदर्शन केले. रविवारी सकाळच्या योग शिबिरास पतंजली योग समितीच्या जिल्ह्या महिला प्रभारी सुजाता शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्ह्या प्रभारी संतोष दुधाळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी याचा जास्ती जास्त लाभ घ्यावा असे आवाहन योग प्रशिक्षक भगवान बनसोडे यांनी केले आहे.
या योग शिबिरास शंकर चौगुले, लिंगाप्पा गडदे, श्रीराम मुद्दे, विलास चिंचोलकर,रंगा दिवटे, सदाशिव बंदपट्टे, रमेश धोत्रे,शिवाजी जाधव ,शरद भांगे विजय जगताप तसेच श्रीसंत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे विध्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत.

