• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, August 25, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण २५ शाळा, त्या पैकी ११ जिल्हा परिषद शाळांना बालाजी स्पेशालिटी केमिकल्सकडून संगणक, स्मार्ट टीव्ही आणि बेंचेसची मदत

by Yes News Marathi
August 6, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण २५ शाळा, त्या पैकी ११ जिल्हा परिषद शाळांना बालाजी स्पेशालिटी केमिकल्सकडून संगणक, स्मार्ट टीव्ही आणि बेंचेसची मदत
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचे कडून सीएसआर अंतर्गत धाराशिव जिल्हयातील ११ जिल्हा परिषद शाळा व १४ इतर माध्यमिक शाळांना साहित्यांचे वितरण करण्यात आले बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या कार्यालयात बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री डी. राम रेडडी यांच्या हस्ते १४ शाळांना ३०० बेंचेस, ५ शाळांना ई लर्निंगकरीता ५५ इंची ५ स्मार्ट टिव्ही, तसेच ६ शाळंना ६ संगणकांचे दि ०५/०८/२०२५ रोजी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे सीएसआर प्रमुख अनिल विपत उपस्थित होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री डी. राम रेडडी यांनी धाराशिव जिल्हयातील लहान लहान गावांमधील जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्याचे वितरण करण्यामागील उद्देष शिक्षकांना व मुख्याध्यापकांना सांगितले, गावातील विदयार्थ्यांना उत्तम प्रशासकिय अधिकारी, उदयोजक, आदर्श शिक्षक बनवा यामुळे गावात सुधारणा होण्यास मदत होईल. बालाजी अमाईन्सच्या सीएसआर अंतर्गत वाडीया हॉस्पीटलच्या ओपीडी चे नुतनीकरण करण्यात आले. येथील शुल्क कमीत कमी ठेवल्याने सामान्य व कष्टकरी कामगार वर्ग तसेच मध्यमवर्गीय यांना लाभ होणार आहे तसेच बालाजी अमाईन्सच्या सीएसआरच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळ येथील मुख्याध्यापक श्री शिवाजी राठोड यांचा सेवानिवृत्ती निमित्त व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथील शिक्षिका ज्ञानेश्वरी शिंदे मॅडम यांना सर फांऊडेशन च्या वतीने नारीशक्ती पुरस्कार मिळाल्यानिमित्त डी. राम रेडडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

या कार्यकमाचे सूत्रसंचालन विठ्ठल नरवडे, धाराशिव शिक्षक संघटनेचे तांबोळी सर, मंगरुळचे राठोड सर, डोलारे सर, बालाजी अमाईन्सचे सीएसआरचे दत्तप्रसाद सांजेकर, अमोल गुंड, बसवराज अंटद धाराशिव जिल्हयातील शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व विदयार्थी उपस्थित होते.

स्मार्ट टिव्ही ५ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी ता तुळजापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळा खुर्द ता तुळजापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी ता तुळजापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ ता तुळजापूर, आर्दश प्राथमिक शाळा तेरखेडा ता वाशी.

संगणक ६ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगाव ता तुळजापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी ता धाराशिव, आझाद ऊर्दु प्राथमिक शाळा डाळिंब, कुमारस्वामी प्राथमिक शाळा उमरगा, शांतीसागर प्राथमिक विद्यालय ता तुळजापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरंबा ता तुळजापूर.
बेंच ३०० – गांधी विदयालय चिखली, संत ज्ञानेश्वर विदयामंदिर बेंबळी, जि प प्राथमिक शाळा राधानगरी उजनी, बावची विद्यालय परांडा, हुतात्मा बोरगावकर माध्यमिक शाळा नळदुर्ग, शरणप्पा मलंग विदयालय उमरगा, तुळजाभवानी माध्यमिक वि‌द्यालय तुळजापूर, जि प प्राथमिक शाळा बिजनवाडी, जि प प्राथमिक शाळा मंगरूळ, जि प प्राथमिक शाळा नंदगाव, जळकोट कुलस्वामीनी आश्रम शाळा, होर्टी इंदिरा गांधी आर्दश आश्रम शाळा यांना बेंच देण्यात आले.
५ शाळांना ५ स्मार्ट टिव्ही, ६ शाळेस ६ संगणक, १९ शाळांना ३०० बेंच

Previous Post

सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पाणी साचले; प्रशासनाकडून तत्काळ मदत कार्य राबविण्यात आले…

Next Post

कर्तुत्ववान मान्यवरांचे विकासात मोठे योगदान

Next Post
कर्तुत्ववान मान्यवरांचे विकासात मोठे योगदान

कर्तुत्ववान मान्यवरांचे विकासात मोठे योगदान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group