सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मालवाहू ट्रकने टोल कर्मचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षा कर्मचारी ट्रकखाली चिरडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, टोल न देता बॅरिगेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना मोहोळ ते पंढरपूर पालखी मार्गावरील पेनूर टोल नाक्यावर घडली. या घटनेत हनुमंत अंकुश माने हा टोल कर्मचारी मृत झाला. आज (9 ऑक्टोबर) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित मालवाहक ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. मोहोळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.