सोलापूर : आदिवासी पारधी समाजाच्या समस्या बाबत मंत्री गावित यांना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजश्री चव्हाण सोलापूर यांनी निवेदन दिल आहे. महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील विविध विकासकामे थांबली होती. त्याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना समक्ष भेटून आदिवासी पारधी समाज हा बराच तालुक्यात व ग्रामीण भागात विखुरलेला असून त्यांची दैनंदिन दुरवस्था झाल्याने त्यांना रोजी रोजगाराच्या शोधार्थ गावोगावी भटकावे लागत आहे.
विविध योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करून निवेदन दिले. त्याप्रसंगी सरचिटणीस नकुल चव्हाण, अनिल भीमराव चव्हाण, भूषण चव्हाण, कलाकार रामचंद्र पवार, सचिन काळे पंढरपूर हे उपस्थित होते