सोलापूर : अपर्णा रायचूर यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त अवयवदान सजगतेसाठी, ३डिसेंबर २०२३ रोजी ई -स्क्वेअर येथे अवयवदान संदर्भातील दोन लघुपट दाखविण्यात येणार आहेत. अपर्णा रायचूर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.२०१७ मध्ये त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती.यानंतर चार वर्षे अपर्णा रायचूर अवयवदान जागृतीसाठी कार्यरत होत्या.आता तेच कार्य रायचूर कुटुंबीय पुढे चालवत आहेत. ‘राख’ आणि ‘दुविधा’ या दोन्ही राहुल पणशीकर दिग्दर्शित लघुपटात मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका आहे. सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते मोहन जोशी आणि राहुल पणशीकर यादिवशी उपस्थित रहाणार आहेत. या लघुपटांची मोफत प्रवेशिका, रायचूर आय केअर सेंटर, विजापूर रोड येथे १ व २ डिसेंबरला दुपारी १२ ते ५ या वेळेत मिळणार आहेत.
प्रवेशिकांसाठी 86688 23206 आणि 94235 26748 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. हरीष रायचूर यांनी केले आहे.