सोलापूर — आपल्यातील अपंगत्वावर मात करून मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दिव्यत्वाचे सुखद दर्शन करून दिले असे मत रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन स्वाती हेरकल यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि शिक्षकांचे कौशल्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी या सदिच्छा भेटीत सांगितले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ,व्यवसाय प्रशिक्षण निर्मितीचा आनंद हा दिव्यांगाना परिपूर्ण करीत असल्याचे दिसून आले असेही त्या या प्रसंगी म्हणाल्या आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रास्ताविक आणि शाळेची माहिती मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी सांगितली. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे अध्यक्ष अर्जुन आष्टगी यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन स्वाती हेरकल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी उपस्थित असलेले डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रमोद शिंदे यांचा सत्कार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केला तर सहायक प्रांतपाल जयेश पटेल यांचा सत्कार शाळेचे खजिनदार राजगोपाल झंवर यांनी केला.
या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा, खजिनदार राजगोपाल झंवर, रोटेरियन जयेश पटेल, जान्हवी माखीजा, क्षितिजा गाताडे, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, विठ्ठल सातपुते, सैपन बागवान, चिदानंद बेनुरे, गंगाधर मदभावी, अजित पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केले.