सोलापूर शहर मध्य मतदार संघातील आमदार देवेंद्र कोठे यांनी रात्री एक वाजता भाषण करून सोलापुरातील विविध प्रश्न विधानसभेत मांडले. सोलापुरात गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणे, आयटी पार्क तसेच सोलापूरच्या विमानतळावरील अतिक्रमण आणि नाईट लँडिंग.. या महत्त्वाच्या बाबींकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर दिले.आमच्या देवेंद्र कोठे यांनी व्यथा मांडल्या असे सांगत सोलापूरचे आयटी पार्क, सोलापुरातील उड्डाणपूल विमानतळावरील नाईटलाइंडिंग सुविधा तसेच गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. राज्यातील विविध विमानतळांवर नाईटलाइनटिंग सुविधा करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे यात सोलापूरचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सोलापूर कडे विशेष लक्ष आहे असेही त्यांनी सांगितले.
