सोलापूरची विमान सेवा म्हणजे एक टिंगली चा विषय झाला होता. होटगी रोड विमानतळावर केलेल्या 60 कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी लोटला. हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खूप प्रयत्न केले मात्र फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने वारंवार तारखा बदलल्या. आता फ्लाई 91 कंपनीकडून नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे तसे फोन देखील काही बिझनेसमन लोकांना कंपनीकडून सुरू झाले आहेत. फ्लाय 91 विमान कंपनीचे पहिले प्रवासी विमान 9 जून रोजी सकाळी दहा वाजता गोव्यावरून सोलापूर विमानतळावर लँड होणार आहे. कालच काँग्रेसने देखील जून महिना अखेरपर्यंत विमान सेवा सुरू न झाल्यास व्हीआयपी ची विमाने सोलापुरात उतरू देणार नाही असा इशारा दिला होता. सोलापूर विकास मंच तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांनीही विमानसेवेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सारखा तगादा लावला होता. त्यामुळे आता एकदाची कंपनीकडून नवीन 9 जून ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. प्रचंड दबाव आल्यामुळे कंपनीने आता सोलापूरकरांना उल्लू बनविणार नाही हे नक्की.