सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांच्या संवर्धनासाठी पार पडली प्राणी प्रेमींची बैठक

0
18

सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर महापालिकेमार्फत तीन-चार वर्ष झाली नसबंदीची मोहीम राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसत आहे.
एकीकडे नसबंदी मोहीम बंद असून लसीकरण मोहीमही बंद आहे त्यामुळे नागरिकांचे व मुक्या जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नसबंदी मोहीम न राबवल्याने कुत्र्यांच्या संख्येत वाढ होऊन भटक्या कुत्र्यां कडून माणसांना चावा घेतल्याच्या घटनासमोर येत आहेत मात्र यात त्या मुक्या जनावरांचा काय दोष आहे. महापालिकेच्या उदासीन कारभाराचा नागरीक व मुक्या जनावरांना त्रास होत आहे.
भटक्या कुत्र्यांनाही आहे जगण्याचा अधिकार. सामान्य माणसांप्रमाणेच कुत्र्यांनाही जगण्याचा आणि खाण्याचा अधिकार घटने मध्ये देण्यात आलेला आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास हा नागरिकांना होत आहे हे खरे असले तरी भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूचे प्रमाणही सोलापूर शहरात वाढताना दिसत आहे. पण याविषयी कुणाचेही लक्ष नाही असेच दिसून येत आहे.ही बाब लक्षात घेऊन भटक्या कुत्र्यांना ही जगण्याचा अधिकार आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी सोलापुरातील युवावर्ग पुढे सरसावला आहे.सोलापूरच्या युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे व लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे यांच्या पुढाकाराने सोलापुरातील प्राणी प्रेमींची बैठक रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
या बैठकीत भटक्या कुत्र्यांच्या बाबत येणाऱ्या अडचणी व त्यावर काय उपाय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
भटक्या कुत्र्यांसाठी सर्व प्राणी प्रेमी संघटना ,संस्था, डाॅक्टरस, सामाजिक कार्यातील व्यक्ती यांना एकत्रित करून लोक सहभागातून काम करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

या बैठकीस पुजा खंदारे,आशुतोष तोंडसे,तुषार खंदारे,त्रिशा पाटील,पूनम टंकसाळ, मेघा शिंदे, श्रद्धा सक्कर्गी, अजय हिरेमठ, शुभम करपे, प्रमोद शिंदे, राजकुमार कोळी, रेवण कोळी, अक्षयकुमार जाधव, परमेश्वर सुतार, व्यंकटेश हेकर, मेघराज हिप्पर्गी, शुभम रुबाडे, समर्थ कुलकर्णी, सुरज जम्मा, प्रतीक कणसे हे उपस्थित होते.