दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर उजनी (टें) गावासमोर असणाऱ्या रस्ता दुभाजकातून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात जात असताना ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MH 45 Y 3655 या दुचाकीला एका पुण्यावरून सोलापूरला जाणाऱ्या एका भरधाव होंडा सिटी कार क्रमांक MH 12 PT 4051 ने समोरुन जोरदार जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला जबर मार लागून जखमी झाला असून , सदर जखमी दुचाकी चालकाला टेंभूर्णी येथील रुग्णवाहिकेमधून खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असता सदर जखमी पुरुषाचा मृत्यू झाला.
असून सदर अपघात एवढा भीषण होता की ॲक्टीवा या दुचाकीच्या समोरच्या भागाचा चेंदा मेंदा झाला असुन या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथिल ग्रस्तीपथक, रुग्णवाहिका पथक,मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंखे (PSI) साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. असून या अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषाचे नाव कृष्णात सोपान पाटील वय ६५ वर्षे रा. उजनी (टे),ता माढा येथील रहिवासी आहेत. सदर अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्थी पथकाचे प्रमुख संतोष खडके साहेब यांनी दिली आहे.