सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेचे अनेक वर्षे प्रभावी सूत्रसंचालन करणारे वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांचे आज दुःखद निधन झाले.सिद्धेश्वर यात्रेच्या काळात त्यांच्या ओघवत्या, भारदस्त आणि अभ्यासपूर्ण वाणीनेसंपूर्ण यात्रा परिसर भारावून जायचा.सूत्रसंचालक म्हणूनच नव्हे तर ‘व्याख्यान केसरी’ म्हणूनही ते सर्वदूर परिचित होते.वेद, पुराणे, धर्मशास्त्र यांचे सखोल ज्ञान आणिश्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी प्रभावी शैली हीच त्यांची खरी ओळख होती.त्यांच्या निधनाने सोलापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

