सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय वस्तीगृहाचे उद्घाटन
सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन देशातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगातील विविध देशामध्ये नोकरीसाठी संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत साकारण्यात आलेल्या वस्तीगृहाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, उद्योजिका चंद्रिका चव्हाण उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जुन 2024 पासुन महाराष्ट्रातील मुलींना सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होस्टेल मिळणार नाही. अशा विद्यार्थ्यांना दर महा पाच हजार तीनशे रुपये देण्यात येतील तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, रहाणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, नविन शैक्षणीक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एका पदवी बरोबर दुसर्या विद्यापीठाची अथवा इतर देशातील विद्यापीठाची पदवी घेता येणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला बहुभाषीक होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भविष्यातील विद्यापीठ विकासासाठी भरिव अनुदानाची मागणी केली. तसेच नविन प्रशासकीय इमारत आणि खेलो इंडिया अंतर्गत क्रिडा संकुलाच्या उद्दघाटनासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रीत करण्याची विनंती कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा यांच्याकडे केली.
रुसा निधीमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये खास परदेशी विद्यार्थ्यांसाठी सदरील वस्तीगृह उभारण्यात आले आहे. या वस्तीगृहात एकूण 12 खोल्या असून त्या सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहेत. एकूण 24 विद्यार्थी यामध्ये राहू शकतात. विद्यापीठात शिक्षण घेणार्या परदेशी विद्यार्थ्यांच्या निवासाची यामुळे सोय होणार आहे. या कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.