सोलापूर : ए. जी. पाटील तंत्रनिकेतन मध्ये राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा पार पडली. यामध्ये एकंदर 301 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी सर्व विभागातून विविध विषयांवर आपल्या पेपरचे तांत्रिक सादरीकरण केले.
या स्पर्धेत गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र अशा विविध राज्यातील स्पर्धकांनी आपले सादरीकरण केले. हे सादरीकरण दोन्ही म्हणजे ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने विभागातील तसेच बाह्य परीक्षकांद्वारे तपासले गेले. या स्पर्धेचे पहिले बक्षीस रुपये 2500, दुसरे बक्षीस रुपये 2000 तर तिसरे बक्षीस रुपये 1500 असे होते. मानचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एस ए पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम ए चौगुले व उपप्राचार्य श्री एस के मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
तर बक्षीस वितरण ग्लोबल इन्फिनिटी ग्रीन पॉवर चे संस्थापक आणि संचालक श्री रविंद्रजी आडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
विभाग वर यशस्वी विद्यार्थी व संस्था पुढील प्रमाणे :
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग :
प्रथम क्रमांक आदित्य राहुल बांगर व भावना बलिंगल ( ए जी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर), द्वितीय क्रमांक आकाश कनकी व व्यंकटेश झुंजारे ( एस पी एम पॉलिटेक्निक, सोलापूर) व तृतीय क्रमांक रितेश लोकरे ( श्रीराम इन्स्टिट्यूट, पानीव)
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग :
प्रथम क्रमांक शुभांगी पामनाथ (शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर), द्वितीय क्रमांक कोमल कोंडगुली व तनिषा गायकवाड (ए जी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर) व तृतीय क्रमांक सत्यम शिवकुमार चौरे व संकेत संभाजी साळुंखे ( शासकीय तंत्रनिकेतन पुणे)
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग :
प्रथम क्रमांक आभा जहागीरदार ( ए जी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर), द्वितीय क्रमांक सुरज कोंडा व विनोद गड्डम ( एस ई एस पॉलिटेक्निक सोलापूर) व तृतीय क्रमांक श्रुती विजापुरे व स्नेहा उंब्रजकर ( शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर).
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग :
प्रथम क्रमांक मृणाल एकबोटे व मयुरी कांचन ( श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक सोलापूर), द्वितीय क्रमांक आयुष लोकरे व श्रेयश अंबुरे ( ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सोलापूर) आणि तृतीय क्रमांक राघवेंद्र गज्जम व मो. शाकीब अन्सारी ( एस. ई. एस. पॉलिटेक्निक, सोलापूर).
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभाग :
प्रथम क्रमांक प्रीती शिंगे व प्रेरणा जगताप ( ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सोलापूर), द्वितीय क्रमांक स्नेहा जाधव व ओम स्वामी ( ए जी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सोलापूर) आणि तृतीय क्रमांक प्रज्ञा क्षीरसागर व ऐश्वर्या थोंटे ( विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, अहमला) तसेच आयुष गुंजन ( ए जी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सोलापूर).
या स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून प्राध्यापक आर पी म्हंता तसेच विभागीय समन्वयक म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून प्राध्यापिका सौ डि. ए. जव्हेरी, कॉम्प्युटर इंजीनियरिंग विभागातून प्रा. एम एम कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून प्राध्यापिका एन एस कांबळे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातून प्राध्यापिका एल एस केंदुले व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातून प्रा. एल एस मरगुर यांनी काम पाहिले.
संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धेश्वर ए पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एस चौगुले, ए जी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. व्हि. व्हि. पोतदार उपप्राचार्य व एस के मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मयुरी अगरखेडकर यांनी केले तर बक्षीस वाचन प्रा. जी. एम. कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शैक्षणिक समन्वयक एस. एन. गवंडी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एन. बी. पवार, कम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख टी. एल. पाटील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. एस. लिगाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. आर. बागबान, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख आर. एस. मोटगी व प्रथम वर्ष इन्चार्ज व्ही. आर. आवटे हे उपस्थित होते.