सोलापूर : दुसऱ्याची जागा लाटून त्याची खरेदी करारनामा व कब्जा पावती करून त्या जागेची विक्री केल्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. करली यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सुप्रिया राजेंद्र नेर्ली वय ५४ वर्षे रा.BC 54 दर्गा रोङ कँप बेळगाव कर्नाटक यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुप्रिया यांचे वङील स्व.शिवशंकर धर्मराव थोबङे यांची वङीलोपार्जित मालकीची हक्काची जागा जुने सर्वै नं.२४८ यासी नविन सर्वै नं .४३ यांचे एकूण क्षेञ १३ हेक्टर १३ R इतकी शेतजमिन मजरेवाङी तालुका उत्तर सोलापूर यांचे नावे होती.सन १९९६ झाली फिर्यादीचे वडीलाचे निधन झाल्यानंतर फिर्यादीची आई व भाऊ यांनी मिळून फिर्यादी व फिर्यादीचे दोन बहिण यांचे नावावर ही जागा केली होती. यातील आरोपी श्रीनिवास करली यांनी सदर जागेचे नरसिंग नगर म्हणून नाव करून या जागेचा स्वतः मालक असल्याचे खोट भासवून ही जागा ही ५० ते ६० लोकांना नोटरीने खरेदीकरारनामा व कब्जा पावती देवून खोटे करारपत्र तयार करून ती जागा विकून फिर्यादीची व जागा विकत घेणाऱ्या लोकांची फसवणूक केली आहे. हे निष्पन्न झाल्याने आरोपी श्रीनिवास करली यांच्यावर फिर्यादींच्या तक्रारीनुसार एम.आय.ङी.सी पोलिस ठाण्यात भादविदं संहीता कलम ४१९, ४२०, ४६३, ४६४, ४६५, ४६७,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल केला .एम.आय.ङी .सी पोलिसांनी आता आरोपी श्रीनिवास करली यांना अटक केली असून सोलापूर येथील न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी ३ दिवसांची पोलिस कोठङी देण्यात आली आहे. आरोपी श्रीनिवास करली हे माजी सभागृह नेता आहेत.