केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. मुख्यत्वे 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठीचा हा अर्थसंकल्प होता. कररचनेत कोणताही बदल नसलेला हा अर्थसंकल्प आहे. गेल्या 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने एक मोठी झेप घेतली आणि देशाने सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल केली आहे. देशाला आर्थिक संकटातून सरकारने मुक्त केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून कमान स्वीकारली तेव्हा देशासमोर अनेक आव्हाने होती. त्या सगळ्या आव्हानांचा स्वीकार करून विकासाकडे वाटचाल केली. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन मोदी सरकार कार्यरत आहे.
80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली. गेल्या 10 वर्षात सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला पाणी, सर्वांसाठी बँक खाती अशी कामे विक्रमी वेळेत पूर्ण केली आहेत. गरीबांचे कल्याण, देशाचे कल्याण, या दृष्टीकोनातून मोदी सरकार काम करत आहे.