मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. दहावी-बारावी परीक्षेबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली असून बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे आणि निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल आणि निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.