मुंबई : सुशांत सिंह राजपूत याला जाऊन आता आठ महिने उलटले आहेत. मात्र, त्याच्या चाहत्यांच्या मनात आजही तो जिवंत आहे. आज सुशांतचा 35 वाढदिवस आहे. याप्रसंगी त्याचे चाहते सोशल मीडियावर भावूक होताना दिसले. ‘सुशांत तू परत ये’, असं चाहते म्हणत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला न्याय मिळवून देण्याची वारंवार मागणी केली.
सुशांतच्या जगभरातील चाहत्यांकडून आजच्या दिवशी ट्विट करण्यात येत आहे. एका युझरने लिहिलं – ‘परत ये, या जगाला तुझी गरज आहे’… तर कुणी त्याच्यासाठी तयार करण्यात आलेला म्युझिकल ट्रिब्युट व्हिडीओ शेअर केला. एका युझरने लिहिलं – 21 जानेवारी… बॉलिवूडच्या इतिहासात कुठल्या अभिनेत्याच्या वाढदिवसासाठी इतकी उत्सुकता कधीही पाहायला मिळाली नाही. तर कुणी लिहिले की- नेहमी प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद..