येस न्युज मराठी नेटवर्क : अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत सिद्धेश्वर शेतकरी पॅनल मधून वार्ड क्रमांक दोन मधून निवडणूक लढले होते सिद्धाराम निंबाळ त्यांचा 35 मताने विजय झालेला आहे. सिद्धाराम मलकारी निंबाळ हा तरुण फक्त एकवीस वर्षाचा असून वयाच्या 21 व्या वर्षी लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल मित्रपरिवार नातेवाइकांकडून अभिनंदन होत आहे.
लोकशाहीचा पहिला स्तंभ म्हणजे निवडणूक निवडणुकीत तरुणांनी यावे आणि आपल्या गावाच्या विकास करावे. 21 वर्ष एकवीस दिवस नूतन सदस्य वय आहे. अक्कलकोट तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून याची कौतुक होत आहेत.