• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंत,अश्विन-विहारीच्या झुंजीमुळे भारताचा पराभव टळला

Yes News Marathi by Yes News Marathi
January 11, 2021
in मुख्य बातमी
0
पंत,अश्विन-विहारीच्या झुंजीमुळे भारताचा पराभव टळला
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णीत राखत, बॉर्डर गावसकर मालिका १-१ बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करत सामना वाचवला. विहारी-अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली.

पाचव्या दिवशी फलंदाजी करताना विहारीनं १६१ चेंडूचा सामना केला. तर अश्विननं विहारीला संयमी साथ देत १२८ चेंडूचा सामना केला. एकवेळ भारतीय संघ सामना गमावेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या जोडीनं संयमी आणि चिवट फलंदाजी करत २५९ चेंडूचा सामना करत भारताचा पराभव टाळला. ऑस्ट्रेलियानं विहारी-अश्विन यांची जोडी फोडण्यासाठी पराकठीचे प्रयत्न केले. कर्णधार पेन यानं तर स्लेजिंगचाही वापर केला. मात्र, अश्विन-विहारी यांनी आपला संयम ढासळू देता भारताचा पराभव टाळला. यांच्या फलंदाजीचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.

भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेचच बाद झाला. पण त्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याने सुरूवातीला सावध खेळ केला, पण नंतर मात्र त्याने सुसाट फलंदाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या.

ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी यांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली. रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त होता. त्यातच भर म्हणून हनुमा विहारीला दुखपत झाली. हनुमा विहारीला धावणेही कठीण झालं होतं. त्यामुळे अश्विन आणि हनुमा विहारीनं सामना वाचवण्याच्या दृष्टीनं फलंदाजी केली. अश्विन-विहारी यांनी संयमी फलंदाजी करत अखेर सामना वाचवला. विहारीनं नाबाद २३ तर अश्विननं नाबाद ३९ धावांची खेळी केली.

दुखापतीचं सत्र सुरुच –
भारतीय संघा दुखापतीमुळे बेजार झाला आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना हनुमा विहारीही दुखापतग्रस्त झाला आहे. याआधीच शमी, उमेश यादव, के. एल राहुल यांनाही कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. त्यात भर म्हणून तिसऱ्या कसोटी सामन्यात तीन खेळाडूंना दुखापत झाली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात विहारी, जाडेजा यांच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंतची दुखापत गंभीर नाही. मात्र, सामन्यानंतरच त्याच्या दुखापतीबाबत स्पष्ट होईल.

पंत-विहारीची झुंज –
ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी दुखापतीनंतरही आपल्या खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं. तिसऱ्या कसोटीतील भारतीय संघाची परिस्थिती पाहून दोघांनीही एखाद्या योध्याप्रमाणे तग धरत कांगारुच्या भेदक माऱ्याचा सामना केला.

Previous Post

पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

Next Post

सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी

सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026