• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

by Yes News Marathi
January 8, 2021
in मुख्य बातमी
0
विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, दि. 08 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

        मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

        विद्यापीठामध्ये विविध विभागांतर्गत तात्पुरत्या कालावधीकरीता कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया केली जाते. मात्र या कामगारांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन दिले जात नाही अशा अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. याची दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आढावा घेतला.

        सामंत म्हणाले, विद्यापीठामध्ये कुशल, अर्धकुशल, अकुशल गटामध्ये तात्पुरत्या कालावधीकरीता कंत्राटी कर्मचारी आणि कामगार काम करीत असतात त्यांना कामगार कायद्यानुसार वर्गवारीनुसार किमान वेतन मिळाले पाहिजे. मात्र काही विद्यापीठांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाहीत अशा तक्रारी आहेत. विद्यापीठांनी कामगार कायद्यानुसार त्यांना किमान वेतन द्यावे, त्यामुळे कामगारांच्या सद्याच्या वेतनापेक्षा किमान 4 ते 5 हजारांनी वाढ होऊन त्यांच्या हक्काचे वेतन मिळेल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

        बैठकीला कामगार विभागाचे आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके, बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु श्री. रामा शास्त्री, कुलसचिव डॉ.बी.एफ.जोगी, अधिष्ठाता डॉ. नलबलवार, सह सहयोगी अधिष्ठाता डॉ.जोशी आदी उपस्थित होते.

Previous Post

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते केशवसृष्टी पुरस्कार प्रदान

Next Post

भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली

Next Post
भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली

भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी - राजदूत अर्चिल झुलियाश्विली

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group