सोलापूर (प्रतिनिधी) : पत्रकार दिनाचे औचित्य साधून लोकमंगल बँकेतर्फे पत्रकारांचा सत्कार बँकेचे चेअरमन आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. देशमुख यांनी सर्व पत्रकारांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचे कौतूक केले. यावेळी दै. सकाळचे अभय दिवाणजी, दै. संचारचे विक्रम खेलबुडे, दै. पुढारीचे प्रशांत माने, दै. सकाळचे संतोष शिरसट, येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे, इन न्यूजचे समाधान वाघमोडे आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. पत्रकारांच्यावतीने अभय दिवाणजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी केली व आभार शाखाधिकारी अनिता जगदाळे यांनी मानले.