येस न्युज मराठी नेटवर्क : अक्षय कुमारने आगामी बच्चन पांडे चित्रपटचे शूटिंग सुरू केले आहे. अक्षयने नुकताच चित्रपटातील त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय राउडी गँगस्टर लूकमध्ये दिसत आहे. या फोटोत अक्षयने काळ्या रंगाचा कुर्ता आणि निळा जीन्स घातलेली दिसत आहे. याशिवाय त्याने डोक्यावर लाल रंगाचा रूमाल बांधलेला दिसत आहे.
या नवीन लूकमधील फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले आहे की, नवीन वर्ष बच्चन पांडे चित्रपटाचे शूटिंग सुरू साजिद नाडियाडवाला सोबत हा माझा दहावा चित्रपट आहे आणि मी पुढेही त्यांच्या चित्रपटात काम करत राहिल, मला तुमच्या शुभेच्छाची आवश्यक्ता आहे आणि मी कसा दिसत आहे हे सांगा.
https://www.instagram.com/p/CJu2RYjnOKj/?utm_source=ig_web_copy_link