सोलापूर : शहरात तब्बल साडेचारशे किलोमीटर फाईव्ह जी नेटवर्कची केबल टाकण्यात येणार आहे. महा नेट द्वारे शहरातील सुमारे साडेतीनशे सरकारी कार्यालयात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे यासाठी शहरात साडेचारशे किलोमीटर 5G केबलचे जाळे टाकण्यात येणार आहे. शासनाच्या महानेट या प्रकल्पाचे काम रिलायन्स जिओ ला मिळाल आहे. त्यामुळे शहरातील साडेचारशे किलोमीटर रस्ते खोदकाम करण्यासाठी आणि त्याची नुकसान भरपाई ची फी भरण्यासाठी रिलायन्स जिओने सोलापूर महापालिकेला फाईल सादर केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोलापूर खरं साठी आनंदाची बातमी असून लवकरच शहरात फाईव्ह जी इंटरनेटची सुविधा उपलब्ध होणार आहे मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर पुन्हा रस्ते खोदले जाणार आहेत