येस न्युज मराठी नेटवर्क : नीतीश कुमार हेच एनडीचे मुख्यमंत्री बनतील असे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाद्वारे ७४ जागा जिंकत राज्यातील दुसरा मोठा पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाने स्पष्टपणे म्हटले आहे. यावर कोणताही संभ्रम नसल्याचेही पक्षाने म्हटले आहे. नीतीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील, कारण ही आमची वचनबद्धता होती. यामध्ये कोणताही संभ्रम नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपते ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे. निवडणुकांमध्ये असे होत असते. काही अधिक जागा जिंकतात, काही कमी. मात्र आम्ही समान भागीदार आहोत, असेही मोदी पुढे म्हणाले.
नीतीश कुमार यांचा पक्ष संयुक्त जनता दलाहून अधिक जागा जिंकल्याच्या एका दिवसानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे वक्तव्य आले आहे. आघाडीमध्ये मोठ्या भावाचा दर्जा हिरावून घेतल्यानंतर देखील नीतीश कुमार एनडीएचे मुख्यमंत्री होणार की नाही?, याबाबतची चर्चा सुरू झाली होती. अनेक लोक याबाबत प्रश्न विचारू लागले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने याचे उत्तर देत सर्वांची तोंडे बंद केली आहेत.
भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये कधीही आपल्या पायावर शासन केलेले नाही आणि नीतीश कुमारांविना राज्यात सत्ता देखील कायम ठेवू शकलेली नाही. मात्र या वेळी भाजप हा पक्ष जेडीयूपेक्षा फारच पुढे निघून गेलेला आहे. अशात नीतीश कुमार यांच्या चौथ्या कार्यकालात शक्ती संतुलन वेगळे होण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.