येस न्युज मराठी नेटवर्क । रविवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी श्री पंचाक्षरी विद्यामंदिर विंचूर येथे नवीन 6 वर्ग खोल्या इमारतीचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभ अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. या भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष पी.एल.कोळी साहेब होते. संस्थेचे आधारवड कै. दि. शी. कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 चे चेअरमन श्री धनंजय गोडबोले सर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राऊंड टेबल यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एम कमळे यांनी केले.
भूमिपूजन व पायाभरणी राउंड टेबल चे पदाधिकारी यांच्या बच्चे कंपनीकडून करण्यात आले. राऊंड टेबल विषयी माहिती प्रोजेक्ट मॅनेजर विजय तापडिया सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. धनंजय गोडबोले सर यांनी प्रोजेक्ट विषयी माहिती सांगून पी. एल. कोळी व पी.एम कमळे यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रोजेक्ट इंजिनियर पुष्कराज सोमानी, राऊंड टेबलचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर हवीनाळे, खजिनदार V.K. पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेऊरे एस.एम यांनी केले. तर आभार सूर्यकांत म्हेत्रे सर यांनी मानले.