सोलापूर: आयुष डॉक्टर्सच्या विविध न्याय मागण्या संदर्भात आज सकाळी ७.३० वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे निमा संघटनेच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेण्यात येऊन डॉक्टरांच्या प्रश्नाबाबत प्रश्न मांडून त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने निमा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायकजी टेंभुर्णीकर सर यांच्या नेतृत्वाखाली, निमा संघटना लीगल कमिटीचे कायदेतज्ञ डॉ. धनंजय कुलकर्णी, सोलापूर ब्रँच सचिव डॉ. राहुल कुलकर्णी सर, खजिनदार डॉ. ऋषिकेश जोकारे सर, निमा सदस्य डॉक्टर किरण देशमुख, भाजप शहर सोलापूर चिटणीस देविदास भैय्या बनसोडे, आमदार विजयकुमार मालक देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उमेश कोळेकर, सोमनाथ मेंडके, रवी मस्के, हे सर्वजण उपस्थित होते.
यावेळी आपल्या मागण्या संबंधित सविस्तर चर्चा होऊन यावेळी MBBS व BAMS डॉक्टर कोरोना महामारी साथीमध्ये लढताना अनेक जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टरांचा मृत्यू होऊन त्यांना मदत मिळाली नाही. तसेच शासनाने डॉक्टरांसाठी विमा संरक्षण जाहीर केले होते परंतु त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. अनेक डॉक्टर व विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून ते गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच MBBS व BAMS डॉक्टर हे समान काम करत आहेत परंतु समान वेतन मिळत नाही. दोघांनाही समान रिस्क तेवढीच आहे. एमबीबीएस डॉक्टरांना पगार जास्त आहे वेतनात तफावत आहे हा दुजाभाव होऊ नये. खाजगी डॉक्टरांचे क्लेम नाकारले गेले आहेत. तसेच विमा संरक्षण लागू नसल्याचे सांगण्यात आले.यावर प्रवीण दरेकर साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व मागण्यांचे प्रश्न लिहून शासन दरबारी मांडून सर्व प्रश्न सोडवण्याचे व तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.