आर्यन, सार्थक, निकिता यांची पुणे विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल चे सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका सोलापूर तसेच सोलापूर तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी इनडोअर स्टेडियम या ठिकाणी घेण्यात आलेल्या 14 व 17 वर्षाखालील जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेत तीन सुवर्ण पदक व एक रौप्य पदक प्राप्त केले.14 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत शाळेतील खेळाडू कुमार आर्यन शितलकुमार वाघमोडे (इयत्ता 6वी) याने 24 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक(सुवर्ण पदक), कुमार. सार्थक विकास जाधव याने 45 ते 49 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक(सुवर्ण पदक), व 17 वर्षा खालील मुलींच्या स्पर्धेत कुमारी निकिता नागेश डोके हिने 50 ते 55 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक) प्राप्त केले आहे. सदर खेळाडूंची पुणे विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे.
तसेच 17 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत कुमार राज मोहन बेलूर इयत्ता (10 वी)याने 49 ते 52 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक( रौप्य पदक ) प्राप्त करत उज्वल यश संपादन केले.
यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे माननीय डॉ. राधिकाताई चिलका, माननीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, माननीय देवेंद्र दादा कोठे, प्रथमेश दादा कोठे, प्राध्यापक विलास बेत, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.
सदर खेळाडूना क्रीडा शिक्षक अतुल सोनके, आशुतोष जाधव , व सहाय्यक प्रशिक्षक मनोज जाधव, औदुंबर गेजगे, नेताजी पवार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळ: यशस्वी खेळाडू समवेत शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा, क्रीडा शिक्षक अतुल सोनके, आशुतोष जाधव.
.