पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठानतर्फे सोनामाता प्रशालेतील ३०० विद्यार्थी – विद्यार्थिनींना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दैनंदिन वापरातील वस्तूंचे किट भेट देण्यात आले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांची मोफत दंत व मौखिक तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, सृष्टी डांगरे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, सरचिटणीस सुधा अळीमोरे, सरचिटणीस डॉ. शिवराज सरतापे, मंडल अध्यक्ष नागेश खरात, चिटणीस प्रकाश राठोड, राहुल डांगरे, योगेश डांगरे, डॉ. मीना काशेट्टी, संस्थेच्या सचिवा कीर्तीलक्ष्मी अत्रे, गौरी आमडेकर, शाळेचे मुख्याध्यापक जिलानी पटेल उपस्थित होते.

प्रारंभी व्याहाती होम करण्यात आला. याप्रसंगी सोनामाता प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना ब्रश, टूथपेस्ट, साबण आणि नॅपकिन असलेले दैनंदिन वापराचे ३०० किट भेट देण्यात आले. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यायाकडून विद्यार्थी विद्यार्थिनींची मोफत दंत व मौखिक तपासणी व सवलतीत उपचार करण्यात आले. यावेळी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा लादे यांनी सूत्रसंचालन तर मोहन कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.