सोलापूर ते मुंबई ही स्टार एयर कडून सुरू केली जाणार्या विमान सेवेची तारीख अद्याप निश्चित नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गणेशोत्सव कालावधीत नाहीतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही विमान सेवा सुरू होईल असे छाती टोकपणे सांगितले. मात्र सप्टेंबर ची 15 तारीख संपली तरीही कंपनीकडून तिकीट बुकिंग संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. वायबिलिटी गॅप फंडिंग या योजनेतून महाराष्ट्र शासन स्टार एअर कंपनीला वर्षाखाली 18 कोटी रुपये अनुदान देणार आहे तरी देखील विमान सेवेचा मुहूर्त नाही. वास्तविक पाहता स्टार एयर कडे तीनच एअरक्राफ्ट आहेत. त्यातील एकाचा बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबई एअरपोर्ट वरचा स्लॉट मिळाला असला तरीही स्टार एअर कंपनीकडून आता विलंब लावला जात आहे. 22 ऑक्टोबर पासून म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती सोलापूरतील एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये कार्य करणाऱ्या एका एजन्सीने सांगितले.