सोलापूर – इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ही संस्था गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत असून इंजिनिअरिंगच्या १५ हुन शाखांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करणारी ही अभियंत्यांची व्यावसायिक अशी संस्था आहे. सोलापूर शाखाही मागील १५ वर्षापासून कार्यरत असून संस्थेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात प्रामुख्याने टेक्निकल सेमिनार, वर्कशॉप, एएमआयई या परीक्षेसाठी मार्गदर्शन, इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सोडविण्यासाठी मार्गदर्शन, विविध कंपन्यांशी सामंजस्य करार, औद्योगिक भेटी, नवीन संशोधनासाठी मदत असे अनेक कार्यक्रम राबवण्यात येतात.
यंदाच्या वर्षीदेखील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), सोलापूर स्थानिक केंद्रामार्फत सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी ५८ वा अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा शिवस्मारक हॉल, सोलापूर येथे पार पडणार असून याप्रसंगी विविध अभियांत्रिकी, संशोधन, नवनिर्मिती व नेतृत्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवर अभियंत्यांना “सर एम. विश्वेश्वरय्या एमिनंट इंजिनिअर पुरस्कार २०२५” प्रदान करून गौरविण्यात येईल या पुरस्कारासाठी निवड झालेल्या अभियंत्यांची नावे पुढीलप्रमाणेः इं. करण शाह (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि., सोलापूर), इ. रूपा पाटील (संस्थापक हार्ट लीडर्स क्लब, बेंगळुरु), इं. रोहित डुमणे (संस्थापक, प्रोजेक्ट अॅडव्हायझरी सर्व्हिस, सोलापूर), इं. विशाल बगले (संस्थापक सल्लागारः अशोक अॅग्रीकल्चर बोरवेल स्टिम्युलेशन सव्र्हिसेस, टेकसोल प्रा. लि.), डॉ. इं. निलेश गायकवाड (वरिष्ठ शास्त्रज, आयसीएआर-राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर), इ. सतीश गुंजे (वरिष्ठ महाव्यवस्थापक इलेक्ट्रिकल डिझाईन, लक्ष्मी हैड्रॉलिक्स, सोलापूर), इं. प्रमोद जोशी (संचालक, स्ट्रकटोन प्रोजेक्ट कन्सल्टंट्स प्रा. लि., सोलापूर), या पुरस्काराचे स्वरूप विश्वेश्वरय्या यांचे शिल्प असलेले सन्मानचिन्ह, प्रसिद्ध कर्नाटकी पगडी, उपरणे व पुष्पगुच्छ असे राहील.

यंदाच्या वर्षीपासून सोलापूरच्या अभियांत्रिकी क्षेत्रात व विकासात भरीव असे योगदान दिलेल्या ज्येष्ठ त्यासाठी हूं. हरी एकनाथ गोडबोले (संचालक, धनमान प्रेसिकास्ट प्रा. लि., सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. पंचवीस हजार, सन्मानपत्र, विश्वेश्वरय्या यांचे शिल्प असलेले सन्मानचिन्ह, प्रसिद्ध कर्नाटकी पगडी, उपरणे व पुष्पगुच्छ असे राहील. या पुरस्कारांचे वितरण इं. विजयजी कांबळे, नवनिर्वाचित चेअरमन, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात येईल.
यादिवशी सकाळच्या सत्रात १०.३० वाजता अभियांत्रिकीच्या अंतिम वर्ष पदवी व डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी “ग्री सक्सेस अॅक्सेलरेटर्स फॉर आत्रप्रेन्युरिअल फ्युचर” या विषयावर विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत बिझनेस मॅटर इं. रूपा पाटील (बेंगळुरू) मार्गदर्शन करणार असून विद्यार्थ्यांना उद्योजकतेतील संधी, जागतिक अनुभवांमधून शिकण्याची संधी व चौकटीबाहेर विचार करण्याची प्रेरणा मिळणार आहे. सेमीनारसाठी इं. डॉ. श्रीकांत जोशी हे संयोजक असणार आहेत.
सदरचा कार्यक्रम विद्यमान चेअरमन इं. डॉ. मोहन देशपांडे, मानद सचिव इ. डॉ. उमेश मुगले, नवनिर्वाचित चेअरमन इ. डॉ. श्रीकांत जोशी, मानद सचिव इं. ओम दरक, संस्थापक अध्यक्ष एच. एन. सोमाणी, संस्थापक सचिव तथा माजी अध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख, इ. डॉ. बी. पी. राँगे, इं. सी. बी. नाडगौडा, इं. एस. एम. शेख, इं. डॉ. एस. एस. पाटील, सर्व माजी सचिव व समिती सदस्य या पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्य, महाविद्यालयातील मुले, औद्योगिक क्षेत्रातील इंजिनियर्स व मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) सोलापूर शाखेचे अध्यक्ष इं. डॉ. मोहन देशपांडे व मानद सचिव इं. डॉ. उमेश मुगळे यांच्या वतीने करण्यात येत आहे.