10 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
सोलापूर – शासकिय आयटीआय मध्ये NCVT नवी दिल्ली अतंर्गत सोलर टेक्निशियन (Electrical) या व्यवसायाची मान्यता मिळालेली आहे. शासकिय आयटीआय मध्ये ५ व्या प्रवेश फेरी अंतर्गत या चालू वर्षापासून नव्याने सोलर टेक्निशियन (Electrical) हा एक वर्ष कालावधीचा कोर्स प्रवेशासाठी उपलब्ध झालेला असल्याचे महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस आर भालचिम यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
यासाठी शैक्षणिक अर्हता १० वी उत्तीर्ण असून प्रवेशाकरिता उपलब्ध जागा २० आहेत. ऑन लाईन प्रवेश अर्ज करण्यची मुदत 10 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. प्रवेश इच्छूक उमेदवारांना अर्ज कोणत्याही ऑन लाईन स्त्रोतामधून भरता येईल. सौर उर्जेचे मुलभुत ज्ञान, सोलर पॅनलची उभारणी, सोलार सिस्टीमचे मेटेनन्स, ग्रीन एनर्जी पध्दती असे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सोलर टेक्निशियन व्यवसाव पुर्ण केल्यानंतर स्वतःचे सोलार इंस्टॉलेशन व्यवसाय सुरु करता येतो तसेच सोलार प्रॉडक्ट डिलरशिप,सोलार मेंटेनन्स सर्व्हिस अशा प्रकाराचे स्व॑यरोजगार करता येतो विद्यार्थ्यांनी खात्रीचा रोजगार किंवा स्व॑यरोजगार उपलब्ध होण्यासाठी आय.टि.आय.मध्ये प्रवेश घेण्याचे अवाहन प्राचार्य, शासकिय आयटिआय सोलापूर, यांनी केले आहे.