सोलापूर : अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन सोलापूर यास संस्थेकडून दरवर्षी दिला जाणारा रंगसाधक पुरस्कार याही वर्षी जाहिर करण्यात आला आहे तो महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमिवरती भरीव काम करणाया रंगसाधकास दिला जातो तो या वर्षी रंगकर्मी प्रा. डॉ. दिलीप घारे, यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र स्मृतीचिन्ह, रोख रु. ११०००/- व शाल, श्रीफळ असे आहे. सदर पुरस्कार निवड समितीमध्ये जेष्ठ रंगकर्मी श्री संजय सावंत, रंगकर्मी सुमित फुलमामडी, गोवर्धन कमटम, यांचा समावेश होता.

तसेच अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन सोलापूर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका (हास्यप्रहसन) स्पर्धा २०२५ च्या अध्यक्षपदी सोलापूरातील जेष्ठ रंगकर्मीचा गौरव करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी सोलापूरातील एका रंगकर्मीस अध्यक्षपद देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. तो यंदा जेष्ठ रंगकर्मी संजय सावंत यांना देण्यात आला आहे. सदर अध्यक्षांची निवड संस्थेचे मुख्य संयोजक अॅड बसवराज सलगर यांनी केले आहे.
अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका (हास्यप्रहसन) स्पर्धा २०२५ या स्पर्धेचे आयोजन या वर्षी रविवार दि. २७जुलै २०२५ रोजी सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्याचे योजले आहे. सदर स्पर्धेचे हे १० वे वर्ष असून ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य स्तरावरती घेतली जाते. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील पुणे, मुंबई ठाणे नाशिक, सातारा, कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी लातूर, परभणी व सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून संघ या स्पर्धेत सहभागी होत असतात. तसेच याही वर्षी वरील शहरातून २८ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
सदर स्पर्धेचे उदघाटन महोत्सवाचे अध्यक्ष श्री संजय सावंत साहेब, अॅड. बसवरताज सलगर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे व तसेच रंगसाधक पुरस्कार वितरण सोहळा व बक्षीस वितरण हे महाराष्ट्राची हसस्यजत्राचे लेखक व दिग्दर्शक श्री सचिन गोस्वामी, जेष्ठ रंगकर्मी विद्या काळे, डॉ. सुहिसिनी शहा, अमित कलगुंटकर, अविनाश गोडसे, डॉ. केदारनाथ काळवणे, धीरज जवळकर (चित्रा हॉटेल), मिलिंद थोबडे, मिलिंद हिंगमिरे, अमित रोडगे, दत्ताजी गायकवाड), इ. च्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी सदरची स्पर्धा ही रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत चालणार आहे तसेच पुरस्कार वितरण सोहळा हा ठिक सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होईल. तरी ही स्पर्धा सोलापूरातील रसिक प्रेक्षकांसाठी खुली (मोफत प्रवेश) रहाणार आहे.
सदर परिषदेस अॅड. बसवराज सलगर, संजय सावंत किरण लोंढे, सचिन जगताप., नितेश फुलारी, सागर देवकुळे, वैशाली बनसोडे, निरंजन राऊळ, प्रतिक कसबे, ओंकार साठे, केदार देशमुख उपस्थित होते. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा पहाण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.