सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात महात्मा बसवेश्वर स्मारक उभारण्याची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या बैठकीस आमदार विजय देशमुख यांनी उपस्थित राहून, स्मारकाचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासाठी अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे मांडले.
या बैठकीत उपस्थित केलेले मुद्दे :
बसवेश्वर स्मारक समितीच्या जागेसंबंधीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा.
प्रशासनाने सदर जागेसाठी केवळ १९ गुंठे जागा उपलब्ध आहे असे उत्तर दिले, मात्र हे उत्तर समाधानकारक नाही.
कृषी विभागाच्या जागेच्या ऐवजी कृष्णा तलावाच्या सभोवतालची जागा विचाराधीन घ्यावी, व ती जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
सदर जागा आरक्षित करून, त्यावर स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा.
हा प्रस्ताव येत्या १५ दिवसांत शासनाकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात यावेत.
संत चोखामेळा स्मारकासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून तो शासनास सादर करण्यात यावा.
या सर्व मागण्यांवर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत, प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस आमदार समाधान अवताडे, आमदार हरिष पिंपळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिजीत पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव श्री. एकनाथ ढवळे, तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
