सोलापूर – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) या योजने अंतर्गत सोलापूर शहर भुयारी गटारीची कामे विभागीय कार्यालय 7 व 8 या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी रघोजी हास्पीटल शेजारी रेल्वे क्रासिंग,बाम्बे पार्क जवळील विवेकानंद स्वामी केंद्र परिसर,राऊत वस्ती,समर्थ नगर,गिरिजा मंगल कार्यालय परिसर इत्यादी ठिकाणावर योजनेतील कामांची भेट देऊन पाहणी केली.जागेवरील परिस्थितीप्रमाणे ड्रेनेज लाईनच्या कामाचा अनुषंगाने मॅनहोल कव्हर आणि प्रापर्टी चेंबर बाबत सुचना दिल्या. तसेच मॅनहोल व प्रापर्टी चेंबरची कामे पूर्ण झालेली आहेत अशा ठिकाणी मनपाने निश्चित केलेप्रमाणे र.रु.2000/- इतके शुल्क आकारुन प्रत्येक घरजोड कनेक्शन करिता मंजूरी देण्यात यावी. व ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकणेचे काम पूर्ण आलेल्या ठिकाणी रस्ते पूर्ववत करणेबाबतचा सूचना देण्यात आल्या.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, प्र.सार्वजनिक आरोग्य अभियंता सतीश एकबोटे, सहा. अभियंता (ड्रेनेज विभाग) रामचंद्र पेंटर आणि पी.एम.सी कडून अनिल जाधव व मक्तेदाराकडून अनिकेत जोशी उपस्थित होते.




