सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी आणि श्रीशैल बनशेट्टी यांचा आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला. माजी महापौर यांना योग्य महाराष्ट्र राज्य स्तरीय जबाबदारी देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेना नेते सिध्दाराम म्हेत्रे, सोलापूर लोकसभा महेश साठे, सोलापूर लोकसभा महिला आघाडी संपर्कप्रमुख अनिता माळगे, युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य प्रियांका परांडे, योगेश माळगे उपस्थित होते.
शोभा बनशेट्टी यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात बंडखोरी करून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात सोलापूर शहर उत्तर मतदार संघात निवडणूक लढवली होती.