सोलापूर : जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये 11वा आंतरराष्ट्रिय योग दिवस साजरा करण्यात आला.
या वेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या सोलापूर जिल्हा योग परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पेंडसे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे स्व . राजेश अण्णा कोठे, स्व. महेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर योग दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुलींनी संगीताच्या तालावर वेगवेगळी कठीण योगासने याची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच शाळेतील विद्यार्थी यशराज कोरे , अनुश्री कुलकर्णी, कुमार केशव परदेशी याने देखील नमो नमो शंकरा… या गाण्यावर आपली योगासने सादर केली.
आयुष मंत्रालयाने 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम जारी केले आहे. 21 जून हा दिवस ” एक पृथ्वी एक आरोग्य” या थीम अंतर्गत शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दंड स्थितीतील, बैठक स्थितीतील , पाठीवरील व पोटावरील आसने केली.



या नंतर प्रमुख पाहुण्या स्नेहल पेंडसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सदर दिनाचे महत्व विशद करताना म्हणाल्या की, ताजे रुचकर आणि चांगले अन्न असतं ते आपल्या शरीराला मदत करतं, मनाची व शरीराची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला रोज व्यायाम आला पाहिजे . योगासने,सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ ,खेळला पाहिजे, मैदानावर गेले पाहिजे, रोज किमान एक ते दीड तास व्यायाम केला पाहिजे. आपला अभ्यास नियमित केला पाहिजे. योगामुळे आपले शरीर आणि मन हे तंदुरुस्त राहत ,त्यामुळे रोज योगासन, सूर्यनमस्कार, ध्यान हे केलं पाहिजे.
सदर योग दिन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे डॉ.राधिका चिलका, डॉ.सूर्यप्रकाश कोठे, मा.देवेंद्र कोठे, मा. प्रथमेश कोठे, प्राध्यापक विलास बेत, शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मागदर्शन लाभले.
योग दिवस यशस्वीरित्या साजरा करण्यासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक आशुतोष जाधव व क्रीडाशिक्षक अतुल सोनके व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेइतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.