महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत आलेले परीस गायकवाड व वैष्णवी गायकवाड यांचा BS प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान…
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६८ व्या.जयंती निमित्त अरविंद धाम येथे BS प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी व्यासपिठावर सुधाकर महाराज इंगळे , पुरुषोत्तम बरडे,अमोल शिंदे ,श्रीकांत घाडगे ,डॉ.किरण देशमुख , श्रीकांत डांगे ,अस्मिता गायकवाड ,बापू वाडेकर, ॲड.सुरेश गायकवाड , गोविंद कांबळे , लहू गायकवाड , ज्ञानेश्वर सपाटे , वैभव गंगणे, मनोज गंगणे ,सुरेश आवताडे, शिवाजी भोसले , मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष निशांत सावळे,शिवाजी वाघमोडे , रोहित नलावडे ,अमोल गरड, प्रवीण पवार ,अक्षय शिंदे , प्रशांत गायकवाड, संभाजी आरमारचे प्रमुख श्रीकांत डांगे व तात्या वाघमोडे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते महाआरती संपन्न झाली.यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय जिजाऊ ,अशा घोषणांनी अरविंद धाम परिसर दणाणून सोडला.
दरम्यान मध्यंतरी झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग च्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादित करणाऱ्या सोलापूरच्या कन्या वैष्णवी राम गायकवाड (राज्यात पाचवी परंतु मुलींमध्ये प्रथम) तसेच व सोलापूरचा सुपुत्र परीस गायकवाड (राज्यात द्वितीय) या दोघांचा शाल व स्मृती चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून सोलापूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवणाऱ्या वैष्णवी व परीस या दोघांचेही व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
यंदाचे हे BS प्रतिष्ठानचे १४ वे वर्ष असून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांवर विशेषतः भर दिला जातो. असे प्रास्ताविक पर भाषणात BS प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत उर्फ बंटी सोनके यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्र युवा पुरस्कार प्राप्त प्रसाद खोबरे यांचा ही कार्यक्रमा दरम्यान सत्कार करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसाद खोबरे यांनी तर आभार गोविंद कांबळे यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल सोनके ,अतुल सोनके,सुमित सोनके, अरविंद सोनके, किशोर कोरके , सौरभ कन्हेरी ,ओंकार उकरंडे, समर्थ पेटकर, उमेश माने , कृष्णा शिंदे , विशाल गंगणे, व समस्त BS मित्र परिवाराचे सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.