राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू” अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणावर राबवून गावातील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करावे.या अभियानात हालगर्जी करणारे ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दिनांक १ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.” कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” वाटचाल दृष्यमान शाश्वत स्वच्छतेकडे या नावाने सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे……