सोलापूर – दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती व जि प सदस्य स्वर्गीय उमाकांत राठोड यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील चाळीस गावांना एकरुख तलावातून पाणी मिळावे म्हणून गेल्या वीस ते पंचवीस वर्षे संघर्ष केले. त्याचेच फलित म्हणून आज दक्षिण सोलापूरच्या 46 गावांपैकी 32 गावांना हिप्परगा एकरुख तलावातून सोडलेल्या पाण्याचे वडजी तांडाजवळ शेतकर्यांच्या वतीने दक्षिण सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली पाण्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना विजय राठोड यांनी स्वर्गीय उमाकांत राठोड यांचे स्वप्न साकार होत असल्याचे आनंद व्यक्त करित, हिप्परगा एकरुख तलावातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील 46 गावांना पाणी मिळावे म्हणून उमाकांत राठोड यांनी जे संघर्ष केले ते सर्व शेतकऱ्यांना माहित आहे. या 46 गावांना पाणी मिळावे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी मोलाचे प्रयत्न केले आणि उरलेल्या 14 गावांना पाणी मिळविण्यासाठी भविष्यात पाणी संघर्ष समिती स्थापन करुन सर्व पक्षिय नेते मन्डळीचे सह्कर्य घेऊन उर्वरित गावना पाणी मिळवून देण्याचे वीजय राठोड़ यानी सांगितले.
प्रारंभी स्वर्गीय उमाकांत राठोड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कॅनॉलमध्ये आलेल्या पाण्याचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्राध्यापक राज साळुंके, जि. प. सदस्य राजू गायकवाड , आशोक कस्तुरे , कासेगाव चे उपसरपंच शंकर वाडकर, अंकुश माने आदिनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाबू मालक चव्हाण, तुकाराम कोळेकर, वडजी चे सरपंच जावेद शेख ,कासेगावचे सरपंच जनार्दन काळे, उपसरपंच शरणाप्पा चौंडे, हमजू मुजावर, महादेव जाधव, सिताराम पवार, नामदेव राठोड, बोरामणीचे उपसरपंच अंकुश राठोड, बक्षीहिप्परगाचे उपसरपंच सिताराम राठोड,सेवू पुढारी, मनोज राठोड, शामराव पाटील, अशोक कस्तुरे, जैनुद्दीन पटेल, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजू वाघमारे, अनंत भिसे, श्रीकांत राठोड, नागु जाधव कमलार भोसले आदी उपस्थित होते.
चौकट
१४ गावांना पाणी मिळवून देऊ…
स्व.उमाकांत राठोड यांनी उभा केलेला लढा असेच पुढे सुरु ठेउन दक्षिण सोलापूर मधील १४ गावांना पाणी मिळवून देऊ ज्या परिसरात या लढयाने हे चळवळ जन्म घेतले त्याच परिसरातील शेतकरी आज तहानलेलाआहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसणे आज गरजेचे आहे.. येणाऱ्या काळात आम्ही तीव्र लढा उभा करु आणि तहानलेल्या१४ गावांना पाणी मिळवून देऊ मगच स्वस्थ बसु….