सोलापुर – शि. प्र. मंडळ कुमठे संचलित एस. पी.एम. पोलिटेक्निकला National Board of Accreditation NBA, नवी दिल्ली यांच्याकडून सर्व कोर्सेसना शैक्षणिक वर्ष २०२५ २०२८ या तीन वर्षासाठी NBA Accreditation नामांकन प्राप्त झाले आहे. सदर नामांकन है तांत्रिक शिक्षणात गुणवतेची ओळख असून, Outcome-Based Education (OBE) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिली जाते.
या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. दिलीपराव माने, संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा. जयकुमार माने, विश्वस्त प्रा. स्वाती माने यांनी सर्व शिक्षकवृंदांचे, विद्यार्थ्यांचे व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.
या मान्यतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या रोहिणी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एन.बी.ए. समन्वयक प्रा. अतुल पतकी व सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी अथक परिश्रम केले. यासाठी मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. मलेशी बगले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. अनंत चौधरी, कंप्युटर विभागप्रमुख प्रा. विवेक राशीनकर, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. गिरीजा दीक्षित, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. ज्ञानेश्वर जाधव, प्रा. गुराप्पा निंबाळकर, प्रा. सना शेख, प्रा. ज्ञानेश्वर शिंदे, श्री अप्पाशा फुलारी आदींनी परिश्रम घेतले.
प्रमुख विश्वस्त मा. जयकुमार माने म्हणाले, “हे नामांकन संस्थेच्या दूरदृष्टी, गुणवता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती आहे. या महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याच्या दिशेने हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे.”
विश्वस्त प्रा. स्वाती माने म्हणाल्या, “ही मान्यता म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नाही, तर विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी उभारलेल्या विश्वासाचा विजय आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच आमची खरी बांधिलकी आहे.”
प्राचार्या रोहिणी चव्हाण यांनी सांगितले की, “एन.बी.ए. मान्यता म्हणजे गुणवता शिक्षणाला मिळालेली अधिकृत मोहोर असून, हे यश म्हणजे सपूर्ण SPM परिवाराच्या सहकार्याची आणि एकसंघ प्रयत्नांची फलश्रुती आहे.”
सदर नामांकनामुळे एस.पी. एम. पोलिटेक्निकचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतक होत आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व पालक वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर पत्रकार परिषदेसाठी संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा. जयकुमार माने, विश्वस्त प्रा. स्वाती माने, प्राचार्या रोहिणी चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर जाधव आदींची उपस्थिती होती.